भजनी मालिका
← भजनांकडे परत

करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी

kari sutra shobhe katavari | tochi ha sonar narahari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥ पायीं वाजती रूणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥ काम चरणींचा तोडरू । परिसा ऊठतसे डीगरू ॥३॥ दक्षिण चरणीचा तोडरू । जयदेव पदाचा गजरू ॥४॥ विठेवरी चरण कमळा । तो जाणा चोखामेळा ॥५॥