भजनी मालिका
← भजनांकडे परत

करी कांहीं मनाएका विचरणा । संतांच्या चरणा न विसंबे

kari kanhin manaeka vicharana | santanchya charana na visambe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करी कांहीं मनाएका विचरणा । संतांच्या चरणा न विसंबे ॥१॥ तयाचा मी दास कामारी दुर्बळ । तेंचि माझे सकळ हित करती ॥२॥ देउनि प्रेमपान्हा लाडिवाळपणें । कृपेचें पोसणें तुमचे मी ॥३॥ जनार्दनीं एका तुमचा तो दास । तयासी उदस धरुं नये ॥४॥