भजनी मालिका
← भजनांकडे परत

करणें जंव कांहीं करूं जाये शेवट

karanen janv kanhin karun jaye shevat

करणें जंव कांहीं करूं जाये शेवट । तव पडे आडवाटे द्वैतभावें ॥१॥ राहिलें करणें नचलें में कर्म । हरिविण देहधर्म चुकताहे ॥२॥ मोक्षालागीं उपाय करितोसि नाना । तंव साधनीं परता पडो पाहे ॥३॥ मुक्ताई करि हरि श्रवण पाठ। तेणें मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥४॥