भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला

kar katavari vaijayati mala | to haridolan dekhiyela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला ॥१॥ रुप सांवळे शोभें विटेवरी । तो हरी डोळेभरी देखियेला ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें ।त्रिभुवन थोकडें दिसतसे ॥३॥