भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापुराचे कळीवर अनळाचा मरगळा

kapurache kalivar analacha maragala

कापुराचे कळीवर अनळाचा मरगळा । भेदोन द्वैताचा सोहळा केविं निवडों पाहे ॥१॥ बोलु अखरीच वळला भीतरी नाहीं आला । तो केविं विठ्ठला पावेजी तुम्हां ॥१॥ मन बुध्दीसी जें आद्य तयासी जें वेद्य । कळिकाळा कवळेना संधि जडोनि जाये ॥३॥ वाचाळपणें परा येवो न ल्हाये दातारा । अनुभवो भीतरा बाहेजु वेडावला ॥४॥ निरयदृष्टी ती खोली येऊनी राहे बुबुळीं । लवण ठाव घेऊनी जळीं केवि निवडों पाहे ॥५॥ निवृत्तिदासु तेथें निवृत्ति करुनी पातें । श्रीगुरुनिवृत्तिनाथें पुढें केलें ॥६॥