भजनी मालिका
← भजनांकडे परत

कपींद्रा सुखी आहे कीं षडगुण तरु हा राम ॥धृ

kapindra sukhi ahe kin shadagun taru ha ram ||dhru

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कपींद्रा सुखी आहे कीं षडगुण तरु हा राम ॥धृ॥ कनक कुरंग पाठी श्रमले । प्रभु सर्वज्ञ काम ॥१॥ मज विरहित त्या निद्रा कैंची । अखिल लोकभिराम ॥२॥ सौमित्रा दुर्वाक्यें छळिलें । त्याचा हा परिणाम ॥३॥ त्र्यंबक भंगीं एका जनार्दन । करिती विबुध प्रणाम ॥४॥