भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांरे स्फुंदतोसी कारे स्फुंदतोसी

kanre sphundatosi kare sphundatosi

कांरे स्फुंदतोसी कारे स्फुंदतोसी । न भजतां विठ्ठलासी नरकीं पडसी ॥१॥ पुण्यापापें बाधा न पवसी गोविंदा । पावशील आपदा स्मरे परमानंदा ॥ध्रु०॥ पुण्य करितां स्वर्ग पापें करितां भोग । नाम जपतां सर्वांग होईल पांडुरंग ॥२॥ देहीं आत्मा जंव आहे । तंव करुनियां पाहे । अंती कोणी नोव्हे धरी वैष्णवाची सोय ॥३॥ जाईल हें आयुष्य न सेवीं विषयविष । पडतील यमपाश वेगीं करी सौरस ॥४॥ बापरखुमदेविवरुविठ्ठलीं मनचरणी गोंवी । हारपला देहभावीं जालासे गोसावी एकरुपें ॥५॥