भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें

kanhich janiv na karavi | ahe jivin hen thaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कांहीच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें ॥१॥ परि मज बोलवी देवो । तेथें उपावो कोणाचा ॥२॥ नव्हे कांही बहुश्रुत । वक्ता पंडित वाचाळ ॥३॥ निळा म्हणे श्रीविठ्ठल । बोलवी बोल ते बोलें ॥४॥