भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही

kamalagabhincha putala | pahatan dise purna kala | shashi lopalase nirala | rupavasahi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥ उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥ रुप साजिरें गोजिरें । दृष्टि पाहतां मन न पुरे । एका जनार्दनीं झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥