भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो

kamaladalaksha gopi jivanalaksha | to alaksha na baise laksha to dekhila vo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो ॥१॥ मनमृग आमुचा वेधोनि गेला । पाहातांचि डोळा श्रीकृष्ण ॥२॥ सहजची आवडी पाहतां समदृष्टी । वेधोनि गेली सृष्टी पाहतां गे माय ॥३॥ एका जनार्दनीं परात्पर शोभला । तेणें मज वेधेंक वेध लाविला गे माय ॥४॥