भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज

kamakrodh vairiyanche todiyele phanse | janardanen sarasen kelen maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज ॥१॥ देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥ कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयीं दाविला आरसा मज ॥३॥ एक जनार्दनीं सहज आटलें । स्वदेहीं भेटलें गुरुकृपें ॥४॥