भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी

kalpataru data pundalik muni | tayasathin parabrahma tishthe ajhuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी ॥१॥ नवलाव गे माय नवलाव गे माय । विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥ शेष श्रमला शास्त्र भागलें । वेवादिती वाहिली अठरा ज्यासी ॥३॥ आदि अंत कोना न कळे जयाचा । मौनावली वाचा वेदादिकीं ॥४॥ तो डोळेभरी पहिला श्रीहरी । एका जनार्दनी वेरझारी खुंटली देवा ॥५॥