भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणें हरि

kalpanepasuni kalpila jo theva | tenen pade gonva nenen hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणें हरि ॥१॥ दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥ इच्छावें तें जवळी हरीचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेता जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥ एका जनार्दनीं सांपडलीं खुण । कल्पना अभिमानी हरि झाल ॥५॥