भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलियुगीं नाम सोपें तें सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची

kaliyugin nam sopen ten sujan | aishi bhasha jan bahutanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलियुगीं नाम सोपें तें सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची ॥१॥ वाल्मिक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राममंत्र ॥२॥ पुराणकर्ता तो व्यास मुगुटमणी । म्हणे रामकृष्ण वदनीं सोपा मंत्र ॥३॥ बहुतांच्या मतें एका जनार्दनी । रामनाम वाणी गाय सदा ॥४॥