भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलियुगी नाम तारक । दुजें होय दुःखदायक

kaliyugi nam tarak | dujen hoy duhkhadayak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलियुगी नाम तारक । दुजें होय दुःखदायक ॥१॥ पहा अनुभवो मना । नाम भवनदी नौका जाणा ॥२॥ अठरा वर्ण याती । नामें पावनचि होती ॥३॥ न करा आळस क्षणभरी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥