भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड

kaliyugamajin thor jale pashand | potasathin sant jale udand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड ॥१॥ नाहीं विश्वास संतदया मानसीं । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥ वेद पठण शास्त्रें संभाषे पुराणमत । अवघें बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥ देव भजन संतपुजन तीर्थ महिमान न कळे मुढ । ऐसें कलियुगीं जाले जाणत जाणत दगडा ॥४॥ एका जनार्दनीं काया वाचा राम जपा । सोपें हें साधन तेणें नोहे पुण्यपापा ॥५॥