भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखे उच्चारितां पर्वत छेदी पापांचे

kaliyugamajin ek harinam sachen | mukhe uchcharitan parvat chhedi papanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखे उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ॥१॥ सर्वभावें भजा एक हरीचें नाम । मंगळा मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥ दोषी अजामेळ तोहि नामें तरला । हरिनामें गणिकेल्चा उद्धार जाहला ॥३॥ एका जनार्दनीं नाम सारांचें सार । स्त्रियादि अत्यंजा एका दांचि उद्धार ॥४॥