भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलीमाजीं सोपें घेतां रामनाम । नाहीं कांहीं श्रम जपतप

kalimajin sopen ghetan ramanam | nahin kanhin shram japatap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलीमाजीं सोपें घेतां रामनाम । नाहीं कांहीं श्रम जपतप ॥१॥ न लगे साधन पंचाग्री धुम्रपान । नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥ योगयाग यज्ञ न लगे वेरझारा । नाममंत्र पुरा जप आधीं ॥३॥ एका जनार्दनीं निश्चयो नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥