भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार

kalimajin daivaten ughad disati phar | naral ani shendur yancha bhadimar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकूं । फजीतखोर ऐसें देव तयाचें तोडावर थुंकु ॥३॥ एका जनार्दनीं सर्वभावें सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥