भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली

kalikemaji jyoti samatvasi ali

कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली । तेचि सामावली दृष्टी ब्रह्मीं ॥१॥ सिंधुमाजी जैसें सैंधव मिळाले । तेवी मन झालें ब्रह्मींलीन ॥२॥ वृक्ष बीजामाजीं जैसा सामावला । बिंदु कां आटला महींत जेवीं ॥३॥ जीव तोच शीव होऊनियां ठेला । शब्द तो मुराला निशब्दांमाजीं ॥४॥ आतां मी तूं कैंचा सर्व एकाकार । जाहला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥५॥