भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळिकाळसी दरारा । रामनाम स्मरण करा

kalikalasi darara | ramanam smaran kara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कळिकाळसी दरारा । रामनाम स्मरण करा ॥१॥ भुक्ति मुक्ति लागती पायां । करितां दया वैष्णवांनीं ॥२॥ सुगम सोपें हेंचि वर्म । नको श्रम मज दुजा ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । नाहीं बडिवार दुसरा ॥४॥