भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळी कोसी कपिला धेनुरे

kali kosi kapila dhenure

काळी कोसी कपिला धेनुरे । तिचें दुभतें काय वानुरे । तिसी बापमाय दोन्ही नाहींरे । ते असक्रिया वेगळी पाहेरे कान्हो ॥१॥ ते अखरीं चरेरे । सर्वसाक्षी वरती जायरे कान्हो ॥२॥ पैल येकी सहस्त्रमुखीरे । तिहीहुनि येकी आहेरे । तिचीं नावें अनंत पाहेरे । तिसी बापमाय कोणरे कान्हो ॥३॥ बापरखुमादेविवरी विठ्ठली पाहेरे । ते पुंडलिकाचे द्वारीं जायेरे । तिचें दुभतें अपरंपाररे । तें दुभतें सहस्त्रधारीरे कान्हो ॥४॥