भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी

kali ghongadi hatin kathi | lagala dhenunche pathi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥ अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥ राधा गोरटीं हातीं वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥ एका जनार्दनीं झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥