भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं

kalel taise bol tujachi bolen | bhid mi na dharin tujhi kanhin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥ काय करूं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥ कोठवरी धांवा पोकारूं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥ चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥