भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यांची वचनें ऐके देव । पंढरिराव प्रीतीनें

jyanchi vachanen aike dev | pandharirav pritinen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्यांची वचनें ऐके देव । पंढरिराव प्रीतीनें ॥१॥ भेटविती भेटे तया । पसरुनियां निज कर ॥२॥ जें जें तया वाटे गोड । तें तें कोड पुरउनी ॥३॥ निळा म्हणे जवळी राहे । त्यांची पाहे निज वास ॥४॥