भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यांचा विश्वास जडला पायीं । हरिवीण कांही नेणती

jyancha vishvas jadala payin | harivin kanhi nenati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्यांचा विश्वास जडला पायीं । हरिवीण कांही नेणती ॥१॥ त्याचा करी अंगिकार । निरसी अंधार ममतेचा ॥२॥ सत्यासत्य दाखवी तया । लावी आपुलीया निजसोई ॥३॥ निळा म्हणे ऐसें वर्म । सांपडे सुगम एकनिष्ठा ॥४॥