भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याकारनें योगें रिघती कपाटीं । तो उभा असे ताटीं चंद्रभागे

jyakaranen yogen righati kapatin | to ubha ase tatin chandrabhage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्याकारनें योगें रिघती कपाटीं । तो उभा असे ताटीं चंद्रभागे ॥१॥ सांवए रुपडें गोजिरे गोमटें । धरिले दोन्ही विटे समचरण ॥२॥ वैजयंती माळा तुळशीहार मिरवला । निढळीं शोभला चंदन वो माय ॥३॥ एका जनार्दनीं मौन्य धरुनी उभा । चैतान्याचा गाभा पाडुरंग ॥४॥