भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचिये आवडी संसार त्यजिला

jyachiye avadi sansar tyajila

ज्याचिये आवडी संसार त्यजिला । तेणें कां अबोला धरिलागे माये ॥ पायां दिधली मिठी घातली जीवें गांठी । साऊमा नये जगजेठी उभा ठेलागे माये ॥१॥ भेटवा वो त्यासी चरण झाडीन केशी । सगुणरुपासि मी वो भाळलिये ॥२॥ क्षेमालागीं जीउ उतावेळ माझा । उचलोनि चारी भुजा देईन क्षेम ॥ कोण्या गुणें कावो रुसला गोवळु । सुखाचा चाबळू मजसी न करीगे माये ॥३॥ ऐसें अवस्थेचें पिसें लाविलेसें कैसें । चित्त नेलें आपणिया सारिसेंगे माये ॥ बापरखुमादेविवरें लावियेलें पिसें । करुनि ठेविलें आपणिया ऐसेंगे माये ॥४॥