भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय । अनुभवाचे पाय पुढें चालती

jyachen gunanam athavitan manachi nahin hoy | anubhavache pay pudhen chalati

ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय । अनुभवाचे पाय पुढें चालती ॥१॥ निर्गुणगे माय गुणवंत जाला । प्रतिबिंबीं बिंबतसे चैतन्याचें मुसे । प्रति ठसावत तें वृंदावनीं ब्रह्म असेगे माये ॥२॥ बापरखुमादेविवरु डोळसु सावळा । द्वैत अद्वैत सोहळा भोगविगे माये ॥३॥