भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी संबंध

jyachen denen na sare kadhin | nahin upadhi sambandh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्याचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी संबंध ॥१॥ एका नामासाठीं सोपें । नारी अमुपें पातकी ॥२॥ शुद्ध अथवा अशुद्ध याती । होत सरती हरिनामें ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । उतरी पार भवनदी ॥४॥