भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचा केला अंगिकार । न मानी भार त्याचा हा

jyacha kela angikar | na mani bhar tyacha ha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्याचा केला अंगिकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥ चंद्रहास्य अर्जुनाचा । पुंडलिकाचा कैवारी ॥२॥ नामदेवा कबिरासी । वागवी सांवत्यासी निजअंकीं ॥३॥ निळा म्हणे एकनाथा । न विसंबे सर्वथा तुकयासी ॥४॥