भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा

jyacha kela angikar | na mani bhar tyacha ha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥ अरिमित्रां सम देणें । एकचि पेणें वैकुंठ ॥२॥ उत्तर मध्यम चांडाळ । देणें स्थळ एकची ॥३॥ एका जनार्दनीं भाकी कींव । उद्धारा जीव पातकी ॥४॥