भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचा आहे त्या अभिमान । मी तों रंक अनाथ दीन

jyacha ahe tya abhiman | mi ton rank anath din

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्याचा आहे त्या अभिमान । मी तों रंक अनाथ दीन ॥१॥ नजगे देणें हा परिहार । होईल सत्याचा आदर ॥२॥ जेणें केलेसेल पुढारें । त्याचे तया उणें पुरें ॥३॥ निळा म्हणे मी मापारी । उभा धणी शिरावरीं ॥४॥