भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या सुखाकारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागी

jya sukhakaranen yogi shinatati | pari navhe prapti tayanlagi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
ज्या सुखाकारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागी ॥१॥ तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पंढरीये ॥२॥ कर ठेवोनी कटीं उभा पाठीमागें । भक्ताचिया पांगे बैसेचि ॥३॥ युग अठ्ठावीस होऊनिया गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥ चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥