भजनी मालिका
← भजनांकडे परत

जुनाट कीर्तनमहिमा । तया काय देऊं उपमा

junat kirtanamahima | taya kay deun upama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जुनाट कीर्तनमहिमा । तया काय देऊं उपमा ॥१॥ धन्य धन्य हरीचे दास । करिती आस कीर्तनीं ॥२॥ मागें तरले पुढें तरती । पहा प्रचीती पुराणीं ॥३॥ म्हणोनि एका काकुलतीं । कीर्तन करा दिनराती ॥४॥