भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव परमात्मा दोन्ही । ऐसे जाणती तेचि ज्ञानी

jiv paramatma donhi | aise janati techi dnyani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीव परमात्मा दोन्ही । ऐसे जाणती तेचि ज्ञानी ॥१॥ ऐसं असोनि संपन्न । सदा करिती माझे भजन ॥२॥ माझ्या भजना हातीं । उसंतु नाहीं दिवसराती ॥३॥ जन नोहें जनार्दन । एका जनार्दनीं लोटांगण ॥४॥