भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिणे मरणें नाहीं आतां । हरीच्या भक्तां कल्पांती

jine maranen nahin atan | harichya bhaktan kalpanti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिणे मरणें नाहीं आतां । हरीच्या भक्तां कल्पांती ॥१॥ त्याच्या ध्यानें तैसेंचि आलें । आपुला विसरले देहभाव ॥२॥ जडोनि ठेली अखंडता । एकात्मता हरिरुपीं ॥३॥ निळा म्हणे झाले संत । गुणातीत निजबोधें ॥४॥