भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें रचियेलें भूगोळा । एकवीस स्वगें लावुनी माळा

jenen rachiyelen bhugola | ekavis svagen lavuni mala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जेणें रचियेलें भूगोळा । एकवीस स्वगें लावुनी माळा ॥१॥ तो हा विटे उभा ठेला । भक्तें पुंडलिकें पूजिला ॥२॥ ज्याचे चरणींहूनि गंगा । उध्दरीत चाले जगा ॥३॥ निळा म्हणे गतिमति । माझी आहे ज्याचे हातीं ॥४॥