भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयातें पाहतां परतला आगमु । निर्गमा नाकळे दुर्गमु

jayaten pahatan paratala agamu | nirgama nakale durgamu

जयातें पाहतां परतला आगमु । निर्गमा नाकळे दुर्गमु । सिध्दांसाधक निरुतें वर्मु । न पडे ठायीं सर्वथा ॥१॥ तें या पुंडलिका वोळलें । प्रेम प्रीतीनें घोळलें । भक्तिमातेनें चाळविलें । आधीन केले आपणया ॥ध्रु०॥ जे माये अविद्ये वेगळें । गुणत्रया नातळे । काळें गोरें न सांवळें । निर्धारितां नेणवे ॥२॥ जें द्वैताहूनि परतें । तें सुखातें वाढवितें । योगी लक्षीं लक्षित ज्यातें । परि नेणवे सर्वथा ॥३॥ जें अरुपा रुपा वेगळे । सहस्त्रनामांहूंनि आगळें । परम कृपेचें कोंवळे । क्रियाकर्मविरहित ॥४॥ जें ब्रह्मरसाचें गोठलें । तें पंढरिये प्रगटलें । बापरखुमादेविवर विठ्ठलें । नामें आथिलें चोखडें रया ॥५॥