भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हर हरि जपे त्याचे हृदयीं मुद्रा

jayajay ramachandra jayajay ramachandra | har hari jape tyache hrudayin mudra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हर हरि जपे त्याचे हृदयीं मुद्रा ॥१॥ सोपा जप अखंड वाचेसी वदतां । कामक्रोध लोभ पळे अहं ममता ॥२॥ कासया जप तप अनुष्ठान वाउगा श्रम । नका गुंतू संसारा वाचे म्हणा रामनाम ॥३॥ वाउगी उपाधी सांडोनी भजा श्रीरामा । एका जनार्दनीं वाचे वदा अत्मारामा ॥४॥