भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती

jayachya darushanen shivadikan trupti | yogi hrudayin jaya dhyati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती । सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥ तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । संवगदे गोपाळ म्हणती कान्हा । पराश्ययंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥ आष्टांग साधन साधितां अटी । नोहे नोहे मुनिजना ज्यांची भेटी । एका जनार्दनी हातीं घेऊनी काठी । गोधनें चारी आवडीं जगजेठी ॥३॥