भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत

jayachya charanan mithi ghali bhaven | dhanya te janave sadaiv sant

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥ प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥ जडजीवां तारक सत्य सत्य वाचे । आणीक तें न वचे उपमे त्याच्या ॥३॥ एका जनार्दनीं कृपाळु संतजन । तेणे मज पावन केलें जगीं ॥४॥