भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती

jayacheni tute bhavabandhan | tayasi jan visarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥ करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्दैवा ॥२॥ मुळींच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ॥३॥ विसरूनि खर्‍या देवासी । भुलले आपुल्या मानसीं ॥४॥ सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥