भजनी मालिका
← भजनांकडे परत

जव्हारियाचे पुढें मांडियलें रत्न

javhariyache pudhen mandiyalen ratna

जव्हारियाचे पुढें मांडियलें रत्न । आतां मोला उणें येईल कैसें ॥१॥ तैसें थापटणें पारखियाचा हात । वाफ जाल्या घात वायां जाती ॥२॥ प्रथम थापटणें निवृत्तीच्या माथा । डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥ तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर । आतां कैचें कोरें में येथें ॥४॥ तेचि थापटणे सोपानाचे डोई । यांत लेश नाही कोरें कोठें ॥५॥ तेंचि थापटणें मुक्ताबाईला हाणी । अमृत संजिवनी उतुं आली ॥६॥ तेंचि थापटणें नामदेवावर होईचो । मोहरे रहाँ लागे |७॥ गोरा म्हणे कोरा राहिला गे । बाई सुन्नेभरि नाहीं भाजीयेला ॥८॥