भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना

janvavarire tanvavari jambuk kari garjana

जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥ जंववरिरे तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिलीं नाहीं बाप ॥ध्रु०॥ जंववरिरे तंववरिरे मैत्रत्त्व संवाद । जंववरी अर्थेसि संबध पाडिला नाहीं बाप ॥२॥ जंववरिरे तंववरी युध्दाचीं मात । जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥३॥ जंववरिरे तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राम्हणा देखिलें नाहीं बाप ॥४॥ जंववरिरे तंववरी बांधी हा संसार । जंव रखुमादेविवर देखिला नाहीं बाप ॥५॥