भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी

janmamaran koden nivari ha sang | bhajen padunrang adhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥ वायांची पसारा नासिलासी सारा । कां रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥ एकविध भाव भक्ति करी मोळी । तेणें कुळींची मुळी हाती लागे ॥३॥ एका जनार्दनीं संतांचा सेवक । तयाचा मग धाक ब्रह्मादिकां ॥४॥