भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें

janmajanmatarichen sukrut jodanen | santacharan pavanen tenen bhagyen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥ हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥ मागणें तें नाहीं आणिक तयासी । संत हे सेवेसी झिजवी अंग ॥३॥ एका जर्नादनीं सेवेसी मन । रात्रंदिवस ध्यान लागो त्याचें ॥४॥