भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो

jane sakalan antarincha | bhav sacha mithya to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणे सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो ॥१॥ तया करी तैसाचि मान । जैसें भजन ज्यापाशीं ॥२॥ जेविं एकचि स्वातीजळ । सर्पी गरळ हिरा भूमीं ॥३॥ निळा म्हणे एकचि हरी । जैशापरी तैसाचि ॥४॥