भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे पाळूं लळा । आदि अवसान सोहळा

jane palun lala | adi avasan sohala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणे पाळूं लळा । आदि अवसान सोहळा ॥१॥ आपुलिया बाळकातें । मोहें प्रतिपाळी त्यांतें ॥२॥ खाऊं जेऊं घाली । ऐसी कृपाळु माउली ॥३॥ निळा म्हणे दुरी । न वचे सांडूनियां क्षणभरी ॥४॥