भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया

janaten asoni nenaten pain jhalen | sukhala pavalen bhaktanchiya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥ कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो । न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥ तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥ चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर । तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥